लठ्ठपणा कसा टाळाल?

लठ्ठपणा म्हणजे काय? त्याची लक्षणे काय असतात त्यामुळे होणारा त्रास हया सगळ्यांविषयी माहिती आपण आधी समजून घेतलेली आहे. लहान मुलांना आपण काय खावे व काय खाऊ नये या विषयी समजून सांगितले पाहिजे. टीव्हीसमोर बसून खाणे हे चुकीचे आहे.

आपण मुलांना योग्य ते जेवण काय खावे. कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा व व्यायामाचे महत्व समजून सांगावे.

  • काही लागले तर स्वतः उठून घ्यायला सांगणे.
  • मुलांना टीव्हीसमोर बसून जेवायला देऊ नये.
  • ग्राऊंडवर खेळायला पाठविणे.
  • सायकलवर जाऊन वाण्याच्या दुकानातून सामान आणण्यास पाठविणे.
  • सायकल चालविणे,

मुलांना योग्य तो आहार दिला गेला पाहिजे व त्या आहाराचे महत्व पटवून सांगणे आवश्यक आहे. बिस्किटे, ब्रेड, मैदाचे पदार्थ, चॉकलेट, केक, केंटबरी, बर्गर, डॉ. जयश्री तोडकर फास्ट फुड, वडापाव या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आणले पाहिजे.

जर लठ्ठपणा आढळला तर मुलांमध्ये पोटाचा घेर वाढलेला दिसला, मानेत व काखेत काळसरपणा जाणवला. किंवा अति तहान लागणे, भूक भूक करणे, या गोष्टी आढळल्यास योग्य त्या तपासण्या करून डॉक्टरांचा मुलांना मैदानावर खेळण्यास प्रोत्साहन द्यावे. उदा. पळण्याचे खेळ, दोरीवरच्या उडधा इ. जर रक्ताच्या तपासण्यांमध्ये काही विशिष्ट बदल दिसले, तर चरबीचे अत्याधिक प्रमाण वाढणे, डायबिटीस सुरू होणे. इ. गोष्टी होण्याची शक्यता असते.

या गोष्टींवर योग्य ते उपाय केले गेले पाहिजे व मुलांना योग्य आहार व विहार यांचे प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. जर या सर्व गोष्टी नाही केल्या तर Bariatric surgery करावी लागते. ही सर्जरी दुर्बीणीतून होते व यामुळे लठ्ठपणा व त्यातून येणारे आजार आटोक्यात येतात व वजन देखील कमी होते. आळशीपणा निघून जातो. स्फूर्ती वाढते, स्मरणशक्ती वाढते. उत्साह वाटतो. लठ्ठपणा कमी होऊन मुले छान प्रकारचे आयुष्य जगू शकतात.

Scroll to Top