उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कसे केले होते ३ महिन्यात १८ किलो वजन कमी, मेटाबॉलिक ट्रिटमेंट म्हणजे काय

Devendra Fadnavis Weight Loss: देवेंद्र फडणवीस हे केवळ राजकारणातच आदर्श नाहीत तर ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठीदेखील आदर्श ठरू शकतात. १२२ किलो वजनावरून १८ किलो वजन ३ महिन्यात त्यांनी कमी केले. हे नक्की कसे केले जाणून घ्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कसे केले होते ३ महिन्यात १८ किलो वजन कमी, मेटाबॉलिक ट्रिटमेंट म्हणजे काय
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांचे वजन १२२ किलो होते हे सांगून विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे आणि ३ महिन्यात १८ किलो वजन त्यांनी कमी केले होते. आपली पत्नी अमृता फडणवीसकडून प्रेरणा घेत त्यांनी वजन कमी करण्याचे मनावर घेतले आणि त्यानंतर १८ किलो वजन कमी करत आरोग्य किती महत्त्वाचे आहे दाखवले आणि वजन कमी करण्यासाठी प्रेरणास्थानही बनले.
देवेंद्र फडणवीस यांनी वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिक उपचार घेतले. मेटाबॉलिक उपाय म्हणजे नेमके काय आणि याचा शरीरावर कसा परिणाम होतो ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. वजन कमी करण्यासाठी तुम्हालाही नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रेरणा घेता येईल.
का वाढले होते वजन

\"\"

कामाच्या ताणामुळे वजन वाढले असल्याचं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी सांगितलं होतं. पहिले वजन कमी केले होते मात्र पुन्हा कामाच्या ताणाने वाढले. अमृता यांनी ५-६ किलो वजन कमी केले तेव्हा पुन्हा एकदा देवेंद्र यांना प्रेरणा मिळाली आणि मनावर घेत त्यांनी वजन कमी केले.
२ महिने डॉक्टरांनी केले निरीक्षण

\"\"

फडणवीस यांच्या डॉक्टर जयश्री तोडकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, साधारण २ महिने देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाचे आणि राहणीमानाचे इव्हॅल्युएशन करण्यात आले, ज्यामध्ये त्यांना जाणवले की, त्यांचे मेटाबॉलिजम हे अत्यंत लवचिक आहे आणि त्यामुळे वैद्यकीय उपचारांनी त्यांचे वजन कमी करता येऊ शकते. तसंच त्यांचे डाएट योग्य नसल्यामुळेही त्यांचे वजन वाढत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
माईक मेहताकडून घेतले व्यायामाचे धडे

\"\"

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेत ३ महिन्यात १८ किलो वजन कमी केले. यासाठी आपले व्यवस्थित डाएट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आखले आणि ट्रेनिंगसाठी माईक मेहताने त्यांना खूपच मदत केली. आठवड्यातून कमीत कमी २ तास त्यांच्याकडून व्यायाम करून घेतला आणि वजन कमी करण्यास भाग पाडले
देवेंद्र फडणवीसांनी केले मेंटेन

\"\"

देवेंद्र फडणवीस यांनी एकदा वजन कमी केले आणि त्यानंतर त्यांनी हे डाएट फॉलो करत अजूनही वजन मेंटेन ठेवल्याचे दिसून येत आहे. १२२ किलो वजनावरून १०४ किलो वजनावर येत १८ किलो ३ महिन्यात कमी करणं हे नक्कीच सोपं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी वजन कमी करत अनेकांना नक्कीच प्रेरणा दिली आहे.

Scroll to Top